Loksabha Election Results 2024 | साताऱ्यात शशिकांत शिंदेंचे पारडे जड, उदयनराजे भोसले २६४३ मतांनी पिछाडीवर

Loksabha Election Results 2024 Live | लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी सकाळपासून सुरू झाली असून महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी महायुतीला २० आणि महाविकास आघाडीला २६ जागा आलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान सातारा येथून भाजपा पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.

भाजपाचे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना ९९८३ मते मिळाली आहेत. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी टिकवून ठेवली असून त्यांच्या खात्यात १२६२६ मते आहेत. अशाप्रकारे शशिकांत शिंदे २६४३ मतांनी (Loksabha Election Results 2024) आघाडीवर आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप