Loksabha Election Results : राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली दोन्ही मतदारसंघात आघाडीवर

Loksabha Election Results 2024 Live : नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील लढतीचे चित्र अखेर आज स्पष्ट होणार आहे. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार येणार की राहुल गांधींची इंडिया आघाडी सत्ता स्थापन करणार, हे आज कळणार आहे. लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून एनडीए सरकार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मात्र स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. तर राहुल गांधी यांनी मात्र वायनाड आणि रायबरेली या दोन्हीही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे.

वायनाड येथून राहुल गांधी ५२००० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह मात्र मागे पडले आहेत. तर रायबरेली येथूनही राहुल गांधींनी ८००० मतांची आघाडी घेतली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप