Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी

उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येत महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan In Ayodhya) उभारण्यासाठी 2 एकरचा भूखंड मंजुर केला असून ते येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत आहे.

हे सदन महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असेल. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी ६७ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच इमारतीचं बांधकाम, विद्युतीकरण आणि अन्य सुविधांसाठी २६० कोटीच्या निधीचं अंदाजपत्रक तयार करण्यात (Maharashtra Sadan In Ayodhya) आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत्रे, मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेचा अभियंता पी.के.सिंग, अभिषेक वर्मा, विनय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप