Namibia vs Australia | टी20त नामिबियाच्या कर्णधाराची कसोटीप्रमाणे खेळी, 17व्या चेंडूवर काढली पहिली धाव, लाजिरवाणा विक्रम नावावर

नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने बुधवारी टी20 विश्वचषक 2024 च्या 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Namibia vs Australia) आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इरास्मसने 17 चेंडूंनंतर आपले खाते उघडले. इरास्मस हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे ज्याला पहिली धाव घेण्यासाठी 17 चेंडू खेळावे लागले.

यासह गेरहार्ड इरास्मसने 17 वर्षांचा लज्जास्पद विक्रम मोडला. यापूर्वी हा नकोसा विक्रम केनियाच्या तन्मय मिश्राच्या नावावर होता. 2007 मध्ये चौरंगी मालिकेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिश्राने 16 चेंडूंत आपले खाते उघडले होते. आता मिश्राच्या नावावरील हा लाजीरवाणा विक्रम नामिबियाचा कर्णधार इरास्मसच्या नावावर जमा झाला आहे.

इरास्मसची संघर्षपूर्ण खेळी
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसला पहिली धाव काढण्यासाठी बराच वेळ लागला तरीही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाची लाज (Namibia vs Australia) वाचवली. इरास्मसने 43 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या, याच्या मदतीने नामिबियाचा संघ 72 धावा करू शकला. मार्कस स्टॉइनिसने इरास्मसचा डाव संपवला.

ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय
ऑस्ट्रेलियन संघाने बुधवारी 86 चेंडू बाकी असताना एकतर्फी झालेल्या सामन्यात नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ 17 षटकांत 72 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 5.4 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी