Ajit Pawar : मतदानापुर्वीच अजितदादांनी बारामतीचं मैदान मारलं, या कारणामुळे होतेय चर्चा

Ajit Pawar : मागील काही महिन्यांपासून राज्याचं राजकीय वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघाभोवती फिरत आहे. यंदा पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाती दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी येत्या ०७ मे रोजी मतदान होत आहे. अशातच मतदानापुर्वी अजितदादांनी शरद पवार यांच्या मिशन बंगल्यासमोरील मैदान मारलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मिशन बंगल्यावर होत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ०७ मे रोजी मतदान होत असल्याने आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. अशातच गेल्या पन्नास वर्षांपासून शरद पवार हे बारामती मतदारसंघातील मिशन बंगल्यासमोरील मैदानावर सांगता सभा घेत होते. मात्र यावेळी हे मैदान अजित पवारांना मिळाले असून सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची सांगता सभा आता याच मैदानावर होत आहे.

गेल्या पन्नास वर्षापासून मग ते लोकसभा असो, कि विधानसभा असो, जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा निवडणुकांसाठी शरद पवारांची सांगता सभा मिशन बंगल्यासमोरील मैदानावर होत होती. मात्र यंदा पहिल्यांदाच शरद पवार यांची सांगता सभा बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील भागात होत आहे. त्यामुळेच मतदानापुर्वीच अजितदादांनी बारामतीचं मैदान मारलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय