पुणे जिल्हा दुध संघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने केले वर्चस्व प्रस्थापित

मुंबई – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अभिनंदन केले आहे.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकत दूध संघावर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. सर्व जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. जिल्हा दूध संघासाठी रविवारी मतदान झाले आणि सोमवारी सकाळी मतमोजणी झाली.

राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या असून सहकारामध्ये राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या दुध संघावर निवडून आलेल्या सर्व संचालकांचेही महेश तपासे यांनी अभिनंदन केले आहे.