Rohit Pawar | आमच्यातील एक खासदार चुकीची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या घरी गेला, लंके-मारणे भेटीवर रोहित पवारांनी मागितली माफी

Rohit Pawar | अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, यादरम्यान गुरुवारी लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली व सत्कारही स्वीकारला. लंकेंच्या या भेटीवरुन त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, याप्रकरणी आता आमदार रोहित पवारांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, आहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश भाऊंच्या (Nilesh Lanke) प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना त्याच्याबाबत माहिती नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. जसं निलेश भाऊंनी माफी तसंच मी सुद्धा माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला. कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु, अशी विनंती आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप