IPL सुरू असतानाच पोलार्डने घेतला धक्कादायक निर्णय, क्रिकेट विश्वात खळबळ

मुंबई –  वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे (Pollard has announced his retirement from international cricket). तो सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा भाग आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तो यावेळी (West Indies)वेस्ट इंडिजच्या T20 आणि ODI संघाचा कर्णधार देखील आहे. त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

आता तो आयपीएल आणि इतर परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. पोलार्डची गणना टी-20 क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. ऑलराऊंडर असलेल्या 34 वर्षांच्या पोलार्डने 123 वनडेमध्ये 26.02 च्या सरासरीने आणि 94.42 च्या स्ट्राईक रेटने 2,706 रन केले, यात 3 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता.

याशिवाय त्याने 55 विकेटही घेतल्या. तसंच टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 101 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.31 ची सरासरी आणि 135.14 च्या स्ट्राईक रेटने 1569 रन केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत, तसंच त्याने 42 विकेटही मिळवल्या. 2012 साली वेस्ट इंडिजने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला, पोलार्ड त्या टीमचा सदस्य होता.