Shirur LokSabha | शिवाजी आढळराव पाटलांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळेल, सुनेने व्यक्त केला विश्वास

हडपसर | शिरूर लोकसभा (Shirur LokSabha)  मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य (Shirur LokSabha) मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अभिजीत बाबर, राष्ट्रवादीच्या नम्रता गोंदळ, रिपाइंच्या सरिता कुंभार, सरिता सोनवणे, छाया बोरूडे, राणी वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी अक्षय आढळराव यांनी ससाणे नगर येथील रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. तसेच ससाणे नगर येथील स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या वतीने त्यांचा स्वामींची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी माधुरी अढळराव म्हणाल्या, आज आम्ही घरोघरी जावून शिवाजीराव अढळराव पाटील यांचा प्रचार करीत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हडपसर भागात महिलांचे प्रश्न, लाईट, पाणी, रास्ते, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे.  या अनेक प्रश्नांवर पुढील काळात काम करण्याची गरज आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा