Porsche car accident | ससूनमध्ये धनिकपुत्राच्या नातेवाईकाने पैसे फेकले, डॉक्टरांकडून ब्लड सॅम्पलची अदलाबदल

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी (Porsche car accident) रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोघांना चिरडले. ज्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु डॉक्टरांना ती पैसे कमवण्याची संधी वाटली आणि त्यांनी चक्क ब्लड सॅम्पल बदण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताला (Porsche car accident) कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे हे ससुन रुग्णालयाच्या forensic medicine and toxicology चे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हळनोर हे अपघात विभागात चीफ मेडिकल ओफिसर आहेत. त्या मुलाचे ब्लड सॅम्पल श्रीहरी हळनोर यांच्या विभागानं घेतले मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो, हे लक्षात आल्यावर ते बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. खरं तर डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र तरीही तावरे यांनी ब्लड सँपल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सँपल टेस्टिंग साठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लेबला पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं.

पुणे पोलिसांनी रक्ताचे नमूने बदलण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांना अटक केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप