पुण्यात सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीला राजस्थानातून अटक; एकाच गावातील २५०० गावकरी सेक्स्टॉर्शनमध्ये

पुणे – राजस्थानमधील एक गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येप्रकरणा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचं गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.

पुणे पोलिसांच्या एका पथकाने त्या गावातून जेव्हा अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. तरीही पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवलं.(Sextortion gang arrested from Rajasthan)

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशीदरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असं त्याने सांगितलं.