Porsche car accident | पुणे अपघात प्रकरणात चालकाला डांबून ठेवल्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Porsche car accident) अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावत त्याला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कलम 365, 366 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल.

पोलीस काय म्हणाले?
याच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी पुण्याचे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी सांगितले होते की, ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न (Porsche car accident) करण्यात आला आहे.

दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले, “अपघातानंतर, अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि वडिलांनी कथितपणे ड्रायव्हरचा फोन काढून घेतला आणि 19 मे ते 20 मे या कालावधीत त्यांना त्यांच्या बंगल्याच्या आवारात ओलीस ठेवले. त्यानंतर चालकाने कसातरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. चालकाच्या पत्नीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याआधी शुक्रवारी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला १४ दिवसांच्या (५ जूनपर्यंत) न्यायालयीन कोठडीत सुधारगृहात पाठवले होते. अल्पवयीन हा रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. पोलिसांनी विशाल अग्रवालला यापूर्वीच अटक केली आहे. न्यायालयाने शुक्रवारी (२४ मे) त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप