आलिया भट्टवर ‘ या ‘ प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे . लॉक डाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आणि बॉलिवूड स्टार्सनी वेगवेगळ्या इव्हेंट्स आणि पार्टीजना बिनधास्त उपस्थिती लावून गळाभेटी घेतल्या अशा बिनधास्त अभिनेत्रींची कोरोनाने देखील गळाभेट घेतली आहे . म्हणण्याचा अर्थ असा कि , करीना कपूर, सीमा खान, अमृता अरोरा, यांचा अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आला आहे .
दरम्यान कभी खुशी कभी गम चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने घरी एका छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आलिया भट्ट, करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर, सीमा खान यांच्यासह अन्य अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. पार्टीनंतर करीना कपूर, सीमा खान, अमृता अरोरा, या अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर आलिया भट्टची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता. मात्र तिला होम क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. त्यामुळे होम क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आलिया आज रात्री चार्टर विमानाने दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. मुंबईत येताच पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे .