अवघ्या 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा भारतीय बाजारात धुमाकूळ

ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजारात धुमाकूळ पाहिल्यांच दिवशी दणक्यात विक्री

2022 मध्ये भारतीय वाहन बाजारपेठेत एकच धुमाकूळ होणार आहे. कारण पुढील वर्षी इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार विक्री होणार आहे. मागील महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यामध्ये चेतक ब्रॅंडला सर्वाधिक मागणी आहे. पण भारतीय ग्राहकांना प्रतीक्षा होती ती ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची अखेर ही प्रतीक्षा संपली. कंपनीने काल पासून ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणास सुरुवात केली.

कंपनीने मागील काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटरची घोषणा केली होती. घोषणेलाच जोरदार प्रतिसाद मिळाला होता. कालपासून वितरण देखील जोरदार सुरू झाले. काल एस वन प्रो आणि एस वन या दोन मॉडेलचे वितरण करण्यात आले. ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. त्यामध्ये ती 75 किलोमीटर रेंज देते. जर इलेक्ट्रिक स्कूटर संपूर्ण चार्ज केली तर ती 150 किमी जात असल्याचा दावा ओलाने केला आहे. हा दावा जर खरा ठरला तर ओला भारतातील नंबर एक इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल.ओलाची भारतात टॅक्सी सेवा आहे, त्या टॅक्सी सेवेस उदंड प्रतिसाद मिळत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेत येत्या काळात ई स्कूटरला बाजारात अधिक मागणी असेल असे म्हटले जाते.या ओला स्कूटरची किंमत 1 लाखापेक्षा अधिक आहे.