“अदानी- शरद पवार यांचे अगोदरपासून संबंध…”, त्या भेटीबाबत काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण

मुंबई- अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. अदानी यांनी पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी नुकतेच हिंडेनबर्ग अहवालाच्या मुद्द्यावरून अदानींना पाठिंबा दर्शवला होता, ज्यानंतर आता अदानींनी त्यांची भेट घेतल्याने (Gautam Adani Meets Sharad Pawar) चर्चांना उधाण आले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या भेटीबाबत पृथ्वीराज चव्हाण (Pru यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘कुणी कुणाला भेटावं याबाबत मी बोलणं योग्य नाही. अदानी- शरद पवार यांचे अगोदरपासून संबंध आहेत. त्यामुळं ते भेटले असतील. मात्र, कॉंग्रेसची अदानींबाबतीत भूमिका कायम आहे. लोक अडचणीत आल्यानंतर वाचण्यासाठी प्रयत्न करतात, तशी अदानी धडपड करत असतील, त्यासाठी त्यांनी भेट घेतली असावी, अशी टिप्पणी आमदार चव्हाण यांनी केली.

ते म्हणाले, आमचे अदानींबद्दलचे प्रश्न कायम आहेत, त्याची उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पाहिजेत. कंपन्या विकून पैसे आणले आहेत, असे अदानी सांगत आहेत. मग, बेनामी कंपन्याच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये का पैसे गुंतवले, भारतात का गुंतवले नाहीत हे सांगावं.’