Ramdas Athawale | आरक्षणाबाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयेगाकडे तक्रार करणार

Ramdas Athawale | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. मागील 10 वर्षात मोदींनी आणि अमित शहांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी कोणत्याही समाज घटकाचे संविधानाने दिलेले आरक्षण कधिही बदलणार नाही. आरक्षणाला कधीही धक्का लागणार नाही. आरक्षणाला संरक्षण देऊन ज्यांना आरक्षण मिळत नाही त्या समाजातील गरिबांना स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाचा ई डब्लू एसचा कायदा मोदींनी लागू केला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तेलंगणामध्ये मोदी आरक्षण हिरावून घेतील असा खोटा आरोप केला आहे. समाजाची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधीच्या या खोटारडेपणाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करित आहोत. राहुल गांधी यांनी केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

हैदराबाद येथे आयोजित रिपाइंच्या बैठकित ते बोलत होते, रिपाइंचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष रविकुमार पसुला हे वरंगल या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडणुक लढत आहेत. तेलंगणात एकुन 17 जागा लोकसभेच्या असून एका जागेवर रिपब्लिकन पक्ष निवडणुक लढत आहे .अन्य 16 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याचे या बैठकित .रामदास आठवले यांनी जाहीर केले.

रामदास आठवले हे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी हैद्राबाद आणि वरंगल येथे प्रचार दौरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10वर्षाच्या त्यांच्या सत्ताकाळात कधी ही आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलेले नाही. त्यांनी अनेकदा आरक्षणाच्या संरक्षणांची भूमिका घेतली आहे.त्यांनी संविधानाला माथा टेकुन शपथ घेतलेली आहे.ओबीसी आयोगाला त्यांनी घटनात्मक दर्जा दिला आहे.10वर्षात चांगले काम करुन मोदींनी जनतेचा विश्वास जिंकला आहे.त्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरले नाहीत.त्यामुळे राहुल गांधी हे मोदींवर धादांत खोटे आरोप करित आहेत.मागील 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या बेछुट आरोपाबाबत राहुल गांधींना माफी मागावी लागली होती.तरी ही राहुल गांधीच्या खोटारडेपणात तसुभर कमी झाली नाही.आता ही आरक्षणाच्या मुद्दया वरून ते मोदींवर खोटे आरोप करित आहेत.समाजाची दिशाभुल करित आहेत.दलित बहुजन जनतेत संभ्रम आणि भिती निमार्ण करण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत.यांची दखल निवडणुक आयोगाने घ्यावी यासाठी निवडणुक आयोगाला ईमेल पाठवून राहुल गांधींची आपण तक्रार करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगीतले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार