गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आहे. गौतमीच्या अश्लील डान्सवरुन बरचं राजकारण झालं. दरम्यान, गौतमीबद्दल राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाष्य केलं आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
गौतमी पाटील महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विकृतीकरण करत आहेत का? असा प्रश्न रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “गौतमी काय करते ते नृत्य (Obscene Dance) नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रीरी प्राप्त होतात, त्या तक्रारीची दखल घेऊन महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवत असते. मात्र राज्यघटनेने (Constitution) तुम्हाला, मला जो व्यक्ती स्वातंत्र्याचा (Individual Freedom), भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणी काय घालवं, काय बोलाव आणि काय खावं, हे कोणी कोणाला सांगू शकत नाही.”