Pune Loksabha Election Results | पुण्याला मिळाला व्हिजनरी खासदार! मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय

महाराष्ट्रातील पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Pune Loksabha Election Results ) लागला असून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 4,09,474 मते मिळवत 80,000 पेक्षा जास्त आघाडी कायम राखत विजय मिळवला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना आतापर्यंत 3,26,557 मते मिळाली आहेत.

मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पुणेकरांचे आभार (Pune Loksabha Election Results ) मानतो. महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते यांचे आभार मानतो. पुण्याला सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी काम करेन. पुणेकरांनी विकासाला, विचारांना मतदान केले.” असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप