… तर मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील – राऊत 

Sanjay Raut : वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्यासाठी धडपडणारे खासदार संजय राऊत यांनी काल भाजपवर जोरदार टीका केली आहे. सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तीन जण देश चालवत आहेत. उद्या आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर तुम्ही सामनामध्ये बातमी वाचाल ईडीच्या भीतीने शाह (Amit Shah), मोदी (Narendra Modi), फडणवीस (Devendra Fadnavis) शिवसेनेत प्रवेश करणार अशी टीका संजय राऊत यांनी  केली आहे.

शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबीरात बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलेय. ते म्हणाले की, आता सगळे भावी मुख्यमंत्री समोर येताय. या भावी मुख्यमंत्र्याचा पीक आलाय. माझ्यासमोरही  एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यत आहोत तोपर्यंत. ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. विद्यामान मुख्यमंत्री समोर आहेत, कोर्ट काय म्हणाल होत आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केलं असते, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेली स्वबळाचा नारा दिला. महाराष्ट्रात भगवा फडकवू असे त्यांनी म्हटले. मुंबईत आमचीच सत्ता येणार..त्याशिवाय महाराष्ट्रातही स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचाय, असेही राऊत म्हणाले.