चू*यागिरी बंद करा, संजय राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं

मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला होता. तर निलेश राणे आणि नितेश राणे या राणे बंधुंनीही राऊतांचा जोरदार टोले लगावले आहेत.

‘संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही. कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही.’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता तर ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला होता.

भाजपच्या या नेत्यांना उत्तर देताना संजय राऊत यांनी चालू पत्रकार परिषदेत शिवी दिल्याने यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. चू*यागिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हे देखील पहा