नातेवाईक म्हणाले तू कंडक्टर होशील त्याने मात्र कलेक्टर होऊन दाखवलं

सोलापूर : ग्रामीण भागातील मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो तो इंग्रजी भाषेमुळे, अनेकदा आपल्याकडे असलेले ज्ञान भाषेचा अडसर निर्माण झाल्यामुळे सांगता येत नाही.  न्यूनगंड निर्माण होतो. असंख्य अडचणी यांचा सामना करत ग्रामीण भागातील अनेक युवक आज प्रशासकीय सेवेत नंबर एकला आहेत. आज आपण अशाच एका युवकांची यशोगाथा पाहणार आहोत, ज्याने असंख्य अडचणी सामना करत डेप्युटी कलेक्टर पदापर्यत मजल मारली आहे. ही यशोगाथा आहे हरेश सुळ यांची.

सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोरोची या गावात हरेश त्यांच्या आई-वडिलांसह राहत होता.  प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. वडील सेवानिवृत्त शिक्षक आता ते शेती करतात. घरात नाही म्हटलं तरी शिक्षणाचं वातावरण होतं. हरेशने अकरावीला पुण्यात प्रवेश घेतला. शालेय शिक्षण मराठी मिडियममधून झाल्यामुळे पुण्यातील वातावरण झेपायला अवघड गेलं. अकरावी – बारावी करून , डीवाय पाटील महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केले. त्या नंतर चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली, पण त्या नोकरीत हरेश मनं काही रमलं नाही.

वडीलांकडून सामाजिक कार्याचा वारासा मिळालेला होता त्यामुळे समाजासाठी काहीतरी करायला हवं ही धडपड मनात होतीचं. अखेर घरच्यांना विश्वासात घेऊन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. स्वताचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, आजूबाजूच्या लोकांनी अक्षरक्षा वेड्यात काढले, इतक्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचं काय खूळ डोक्यात घेतलं आहे, असं अनेकांनी सांगितलं. हरिश ओळखीतल्या एका व्यक्तीकडे व्यवसायाची माहिती घेण्यासाठी गेले, त्या व्यक्तीने व्यवसायाचा सल्ला तर दिलाच पण त्यांच्या वडिलांनी हरिशला स्पर्धा परीक्षा करण्याचा देखील सल्ला दिला.

हरिशला देखील सल्ला पटला. घरच्यांना सांगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्पर्धा -परीक्षा काय आहे, त्यांचे क्लासेस यांची सर्व माहिती काढली. इंग्लिशची अडचण असल्यामुळे अभ्यास करताना खूप त्रास व्हायचा पण हरिशने प्रयत्न सोडले नाहीत. एक पूर्व परीक्षा दिली 6 मार्क्सने नंबर हुकला. आयुष्यात पहिल्यांदा अपयश आलं.त्यामुळे हरिश खचून गेला. मग मित्राने स्टाफ सिलेक्शन करण्याचा सल्ला दिला,तिथे देखील 2 वेळा अपयश आले.

अखेर mpsc करण्याचे ठरविले. पूर्व परीक्षा देखील पास केली.पण 15-20 मार्क्सने मुलाखत राहिली. हे सर करत 3 -4 वर्ष गेली. अगदी थोड्या-थोड्या मार्क्सने अपयश येत होतं. पण वडील मात्र हरिशचा आत्मविश्वास टिकवून ठेवत होते. नातेवाईकांनी चेष्टा करायला सुरुवात केली. कलेक्टर नाहीतर कंडक्टर तर होशील अशी खिल्ली देखील उडविली. लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. मुलगा शेती करतो असं सांगायला सुरुवात केली.

नातेवाईक-मित्र सतत खिल्ली उडवत असल्यामुळे हरिशने सर्वाशी संपर्क थांबविला. 2019ला पुन्हा जाहिरात आली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून परीक्षा देण्याचे ठरविले. स्वताचे निरीक्षण केले, पुन्हा जोरदार अभ्यास केला आणि परीक्षा दिली. पूर्व परीक्षा, मुलाखत सारं काही उत्तम झालं पण कोरोनामुळे निकाल लांबणीवर पडला. आत्मविश्वास होता पण बी प्लान म्हणून शेती करायला सुरुवात केली. वडील देखील निवृत्त झाले ,दोघे मिळून शेती करत होते.

लोक मुद्दामून साहेब म्हणून चिडवायचे, निकालाचा दिवस उजाडला, हरिश शेतात उसाचे पाचट उचलत होता वडील म्हणाले आज तुझा निकाल आहे ना? तू काम बाजूला ठेव आणि आणि निकाल बघ बरं. बांधावर बसला आणि निकालाची फाइल उघडली आणि जोरात ओरडला मी उपजिल्हाअधिकारी झालो रे.. गावात एकच जल्लोष झाला. मोठी मिरवणूक निघाली. डेप्युटी कलेक्टर, रँक २२ असा निकाल लागला होता.

हे देखील पहा