Shah Rukh Khan | ट्रॉफी येतेय! KKR टीम फायनलमध्ये पोहोचल्यानंतर जल्लोषात मग्न, शाहरुखने चाहत्यांचे मानले आभार

Shah Rukh Khan | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे मालक शाहरुख खानने (Shah Rukh Khan) क्वालिफायर-1 सामन्यानंतर जोरदार जल्लोष साजरा केला. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सेलिब्रेशनमध्ये गुंतला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आता 26 मे रोजी चेन्नई येथे क्वालिफायर-2 च्या विजेत्या संघाशी थेट आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) विजयानंतर शाहरुख खान मैदानात आला. यावेळी शाहरुख खानसोबत मुलगी सुहाना आणि लहान मुलगा अबरामही उपस्थित होते. शाहरुख खानने मुलांसह मैदानात फिरून हात जोडून चाहत्यांचे आभार मानले. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर शाहरुख खान खूप आनंदी दिसत होता.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला पुन्हा एकदा 2012 आणि 2014 नंतर तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. कर्णधार श्रेयस अय्यर (24 चेंडूत नाबाद 58) आणि व्यंकटेश अय्यर (28 चेंडूत नाबाद 51 धावा) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर मिचेल स्टार्क (34 धावांत तीन विकेट्स) याच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर कोलकाता नाइट रायडर्सने विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादला 38 धावांनी पराभूत केले आणि फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.

सनरायझर्सचा डाव 159 धावांत गुंडाळल्यानंतर केकेआरने केवळ 13.4 षटकांत दोन गडी गमावून 164 धावा केल्या आणि चौथ्यांदा या लीगमध्ये अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. तथापि, सनरायझर्स हैदराबादचा (SRH) प्रवास अद्याप संपलेला नाही. सनरायझर्स हैदराबादला (SRH) अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळेल. सनरायझर्स हैदराबाद (SRH) चेन्नई येथे 24 मे रोजी एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी भिडणार आहे. क्वालिफायर-2 मधील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप