महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरात पैशांची खाण

फरिदाबाद – अवैध उत्खननाप्रकरणी ईडीने शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास देशभरात छापेमारी केली. ही कारवाई झारखंडच्या वरिष्ठ सनदी अधिकारी पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या 20 ठिकाणांवर करण्यात आली. त्यात सिंघल यांच्या निकटवर्तीय सीएच्या घरी तब्बल 25 कोटींची रोकड  सापडली असल्याचे वृत्त आहे.

ईडीच्यावतीने ही रोकड मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने एकाचवेळी झारखंडच्या रांची, धनबाद, खूंटी, राजस्थानचे जयपूर, हरियाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राम, पश्चिम बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्ली-एनसीआरमध्ये छापेमारी केली टाकले.

ईडीने मनरेगा घोटाळ्यातील एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. ईडीने या शपथपत्राद्वारे कोर्टापुढे झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील मनरेगातील 18.06 कोटींच्या घोटाळ्यावेळी पूजा सिंघल त्या ठिकाणी उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या असले स्पष्ट केले होते.

पूजा सिंघल यांनी 2 एनजीओंना मनरेगांतर्गत 6 कोटींची आगाऊ उचल दिल्याचा आरोप आहे. यात वेल्फेअर पॉइंट व प्रेरणा निकेतन या 2 स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. ही रकम मुसळीच्या शेतीसाठी वाटप करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात तिथे कोणतेही कार्य झाले नव्हते. त्याची चौकशी अद्याप सुरू आहे.

याशिवाय, पलामू जिल्ह्याच्या उपायुक्तपदी असताना पूजा सिंघल यांच्यावर जवळपास 83 एकर वनभूमी एका खासगी कंपनीला उत्खनन करण्यासाठी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. हे कठौतिया कोल माइंसशी संबंधित प्रकरण आहे. ईडीने कोर्टाला या प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.