Sharad Pawar | संविधानाने दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची

Sharad Pawar | लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जाहीर झाली आहे. लोकशाहीला आघात देणारी, मुलभूत अधिकार उध्वस्त करणारी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणाऱ्या विचारधारेचा पराभव करणं आणि या देशाच्या जनतेचं भविष्य हे योग्य राहील याची काळजी घेणं हेच काम आपल्याला करायचं आहे व त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक घटनेने तुम्हा आम्हाला दिलेले अधिकाराचे जतन करण्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्धा येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे (Amar Kale) यांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेतून मार्गदर्शन करताना बोलत होते.

शरद पवार  म्हणाले की, आज देशाचा  राजकारण आणि अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही शक्ती दिली गेली त्या सर्व गोष्टींचा परिणाम देशामध्ये अघोषित आणीबाणी बघायला मिळत आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत सर्वच नेते रविवारी एकत्रित होते त्यावेळी आम्ही सर्वांनी मिळून रामलीला मैदानात शपथ घेतली की या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती आहे. त्यामधून देशातील कोट्यावधी लोकांची सुटका करायची असेल तर  मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित राहणं आणि एक मोठी शक्ती दाखवून त्या माध्यमातून भाजप आणि भाजपच्या विचाराच्या लोकांचा पराभव करण्याचा निश्चय आम्ही सर्वांनी घेतला आहे असे शरद पवार म्हणाले.

वर्धा हे स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक इतिहासिक भूमी आहे. वर्धा ते महात्मा गांधी यांचे वास्तव्य होते. या वास्तव्यामध्ये जो काही संदेश दिला आहे त्याचा स्मारन करण आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिच्यावर मात करणे तुम्हाला आणि मला करायचं आहे. त्यासाठीच एक कर्तुत्वान गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करत आहे. असा जागरूक उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पवार पक्षाच्या वतीने अमर काळे यांच्या रूपात देण्यात आला आहे. त्यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे रहावे असेही शरद पवार  म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघात करिता उमेदवार म्हणून घोषित केलेले अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत भरण्यात  आला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका