Baramati LokSabha | ‘अजित पवार शब्दाचे पक्के नेते’ म्हणत शेतकरी कृती समितीचा सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठींबा

बारामती | लोकसभेच्या तिसऱ्या टप्याची मतदान तारीख जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत आहे. बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रकाराचा झंझावात सुरू आहे.  बारामती मधील शेतकरी कृती समितीने सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून यामुळे महायुती अधिक भक्कम झाली आहे.

गडदरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या नेतृत्वात  सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील महायुतीचे कार्यकर्ते व शेतकरी कृती समिती यांचा संयुक्त मेळावा झाला. यानिमित्ताने सतीश काकडे यांनी काकडे गट व शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सतीश काकडे म्हणाले, ‘‘अजित पवार शब्दाचे पक्के नेते आहेत. बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघात विकासाची गंगा, मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे अजित पवार विकासकामे खेचून आणतील. यासाठी सुनेत्रा पवार यांना खासदार करणे आवश्यक आहे,’’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन