Sharad Pawar: हा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ! शरद पवारांचे नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Sharad Pawar : माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थ होईन असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हल्ली माझ्यावर फार राग दाखवत आहे. मोदी यांनी एकेकाळी भाषण केले होते की, मी शरद पवार यांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता तेच मोदी बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे. हे खरं आहे माझा आत्मा अस्वस्थ आहे. परंतु, तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर जनता भोगत असलेल्या दु:खासाठी अस्वस्थ आहे असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, तो अस्वस्थ आत्मा मागील ४५ वर्षे राज्याचे राजकारण अस्थिर करत आहे. तो राज्यातील सरकार अडचणीत आणतो. हे खरं आहे माझा आत्मा अस्वस्थ आहे. परंतु, तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर जनता भोगत असलेल्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. देशातील शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल, तर त्यामध्ये काही चुकीचे वाटत नाही. सध्या संपूर्ण देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना दररोजचा संसार चालवणे अवघड झाले आहे. या गोष्टीसाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार म्हणाले की, सर्व सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीच कोणतीही तडजोड करणार नाही. असे शरद पवार साहेब यांनी मोदींना ठणकावून सांगितले. मी तडफड करत आहे. होय, मी देशातील लोकांचं दु:ख पाहून खूप तडफडतो. त्यासाठी मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र देखील दिल्लीपुढे लाचार होणार नाही असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आमचं घर फोडलं, माझा पक्ष फोडला आणि अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांनासुद्धा फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण राज्याच्या दृष्टिकोनातून अजिबात हिताचे नाही. खरं तर जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, येथे मात्र अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान मोदी रविवारी पुण्यात म्हणाले की, मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. परंतु, जनतेने ज्यांच्यावर विश्वास टाकला आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा नाही तर आणखी काय म्हणा. तुम्ही मात्र हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करताय असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी