Shivajirao Adhalarao Patil | १५-१६ गावांनी कोल्हेंना वेशीवरच अडवले, त्यामुळे दिशाभूल करून ते सहानुभूती मिळवतायत

Shivajirao Adhalarao Patil | शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदार संघात चौथ्या टप्यात मतदान होणार आहे, यामुले आज मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.  महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याकडे  विकासाचे मुद्दे नाहीत. माझ्या काळात  मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय ते घेत आहे. मात्र, आता १५-१६ गावांनी या उमेदवाराला वेशीवरच अडविले आहे. तर एका गावाने २२ – निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही न झाल्याबद्दलचा जाब विचारला – आहे. त्यामुळे दिशाभूल करून ते सहानुभूती मिळवत आहेत. असा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केला.

भोसरी येथे आयोजित विजय संकल्प सभेत आढालराव बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, शिरूर मतदारसंघासाठी आलेला निधी खर्च न करणारा खासदार आपण पाच वर्षे पाहिला आहे.  खासदार डॉ. अमोल कोल्हे दिल्लीला गेले ते परत मतदारसंघात आले नाहीत. गावभेट दौरा, कोणाला भेट नाही. फोन उचलत नाहीत. ८० टक्के खासदार निधी वापराविना परत गेला. विकासाचा मुद्दा नसल्याने खोटे-नाटे आरोप करत असून दिशाभूल करत आहेत. सहानुभूती मिळविण्यासाठी एकनिष्ट असल्याचे सांगत आहेत.  मात्र प्रत्यक्षात पाच पक्ष बदलेल्या कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कोल्हे महागद्दार आहेत. ते आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Raj Thackeray : जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

Murlidhar Mohol : पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही- मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार, अमोल कोल्हे यांची घोषणा