तुळजाभवानीच्या मंदिरात गुढीपाडव्याचा सण ‘असा’ झाला साजरा

तुळजापूर – हिंदू नववर्षचा प्रथम दिन म्हणजे गुढीपाडवा (Gudhi Padwa)आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या (Shri. Tulja Bhavani Mata) मुख्यगर्भगृह शिखरावर चरणतिर्थ होताच सुर्यादय होत असताना श्रीतुळजाभवानी चे मंहत श्रीतुकोजी बुवा व त्यांचे शिष्य मंहत वाकोजीबुवा यांनी गुढी उभारुन त्यांचे पुजन केले .

श्रीतुळजाभवानी मंदीराचा मुख्यगर्भगृह शिखरावर गुढीपाडव्या दिनी गुढी पाडव्या दिनी देवीच्या आबदागिरीला साडी चोळी सारखेचा हार लिंबफाटे बांधुन गुढी उभारण्याची परंपरा पुरातन असुन ती आजही पाळली जाते, गुढीपाडव्या दिनी श्रीतुळजाभवानी मातेस सकाळी दुग्धअभिषेक केल्यानंतर वस्ञ नेसविण्यात आल्यानंतर ऐक नंबर डब्यातील संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.

आज मंदीरात जावळ काढणे सह अनेक विधी शुभमुहुर्तावर संपन्न झाले. हुताशनी पोर्णिमा दिनी देविजींचा छबिना काढण्यात येत येतो. आज गुढीपाडव्या दिनी राञी काढण्यात आला होता.