Prakash Ambedkar | हा घोंचू मोदी आपल्याला अजून कसले दिवस दाखवणार? प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

मुंबई | मोदी आपल्याला कसले कसले दिवस दाखवणार ? असा सवाल करीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सियाचीनजवळील शक्सगाम खोऱ्यातील चीनच्या हालचालींनंतर आता नेपाळने आपल्याला ठेंगा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे!

नवीन नेपाळी 100 रुपयांच्या नोटेवर नेपाळचा नकाशा असेल, ज्यामध्ये भारतीय प्रदेश लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी नेपाळच्या भूभागाचा भाग म्हणून दर्शविला जाणार असल्याचेही त्यांनी यामध्ये नमूद केले.

दिवसेंदिवस आपल्या शेजारील देशांशी भारताचे संबंध तणावपूर्ण होत आहेत आणि भारतीय उपखंडात चीनपुढे आपले वर्चस्व आपण सातत्याने गमावत आहोत. लाल-लाल आंखों में क्या हो गया मोदी? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित करीत ॲड. आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोदींना सुनावलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय