चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा; गडकरींची घोषणा

नवी दिल्ली : रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, नियम तोडून रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकची ही प्रवृत्ती रोखण्यासाठी १००० रूपये दंड करण्याबाबत आपले मंत्रालय लवकरच कायदा आणण्याचाही विचार करत असल्याचे गडकरी म्हणाले. इमारती बांधताना पार्किंगसाठी पुरेशी जागा न ठेवणे खेदकारक असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की पार्किंगच्या जागेचा अभावामुळे लोक रस्त्यांवरच वाहने उभी करतात.असं ते म्हणाले.

गडकरी यांनी सांगितले की, आम्ही रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या (उभ्या केलेल्या) वाहनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत.रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनासाठी वाहन मालकाडून १००० रुपये दंड आकारला जाईल, असा कायदा आम्ही आणणार आहोत. तसेच चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे फोटो काढून पाठवणाऱ्या नागरिकाला ५०० रुपये दिले जातील. या नियमामुळे लोक नो पार्किंमध्ये, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहनं उभी करणार नाहीत. प्रामुख्याने शहरांमधील वाहतूक व्यवस्था यामुळे सुरळीत होण्यास मदत होईल.