Ashish Shelar | उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढाई असली विरुद्ध नकली, आशिष शेलार यांचा टोला

Ashish Shelar | उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा (North West Mumbai Lok Sabha)  मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Rabindra Waikar) यांच्या प्रचाराचा नारळ शनिवारी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या हस्ते वाढवण्यात आला. या मतदार संघातील लढाई असली विरुद्ध नकली अशी आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काल संध्याकाळी महायुतीची जाहीर सभा गोरेगाव बांगूर नगर येथे संपन्न झाली. ही लोकसभेची निवडणूक असली आणि नकलीमधली लढाई आहे. पाकिस्तानची भाषा बोलणारे आणि दहशतवाद्यांना घरात घुसून मारणाऱ्यांमधली ही लढाई आहे, अशी भूमिका या सभेला संबोधित करत असताना आमदार अँड आशिष शेलार यांनी मांडली.

त्यामुळे ही लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून मतदारांनी असली शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी केले. ज्या काँग्रेसने मुंबईला केंद्रशासित केले, महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या काँग्रेसने आंदोलन करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे मराठी माणसाचे काँग्रेसच्या हाताला लागलेले रक्त उद्धव ठाकरे यांच्या हातालाही लागले आहे. म्हणून त्यांची शिवसेना नकली आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसशी कधीच हात मिळवणी केली नाही. त्यांची असली शिवसेना आज आमच्या सोबत आहे असेही त्यांनी नमूद केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा