Jammu and Kashmir | जम्मू काश्मीरमधला दहशतवादाच्या विरोधातला लढा आता निर्णायक पातळीवर आला आहे’

Jammu and Kashmir | नवनव्या उपाययोजनांद्वारे दहशतवादाचा संपूर्ण नायनाट करण्याबाबतचं उदाहरण घालून देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी काल नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीर मधल्या (Jammu and Kashmir) सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

दहशतवादाला त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयानं युद्धपातळीवर काम करावं असे आदेश त्यांनी या आढावा बैठकीत दिले. जम्मू काश्मीरमधला दहशतवादाच्या विरोधातला लढा आता निर्णायक पातळीवर आला आहे असे देखील शाह यांनी म्हटले आहे.

दहशतवाद्यांचा अत्यंत सुनियोजित हिंसाचार आता कमी झाला असून दहशतवादी कृत्यं केवळ लुटुपुटूच्या लढाईवर आली आहेत असं नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरुन दिसून येतं असं शहा म्हणाले. दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता असलेली ठिकाणं ओळखून तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर अधिक लक्ष द्यावं असं केंद्रिय गृहमंत्र्यांनी सुचवलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप