‘चित्रपटातील भूमिकेसाठी कुणीही तुम्हाला कोणासोबतही झोपायला…’ अभिनेत्री नीना गुप्तांच्या वक्तव्याची चर्चा

Neena Gupta: नीना गुप्ता (Neena Gupta On Casting Couch) सध्या ‘मेट्रो… इन डिनो’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख या कलाकारांचा समावेश आहे. हा आगामी चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट व्हावा यासाठी स्टार्स चाहत्यांमध्ये चित्रपटाचे सतत प्रमोशन करत आहेत. यासोबतच नीना गुप्ता त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दलही अनेक गोष्टी शेअर करत आहे.

या सगळ्यामध्ये नीना गुप्ता यांची एक जुनी मुलाखत खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये त्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. मात्र, आता त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. 2021 मध्ये एका मुलाखतीत नीना म्हणाल्या होत्या की, “कोणत्याही नवोदित अभिनेत्रीला चित्रपटातील भूमिकेसाठी कोणासोबतही झोपायला भाग पाडले जात नाही. त्यांना किती तडजोड करायची आहे हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे.”

इंडस्ट्रीत येणाऱ्या नव्या कलाकारांना खास सल्ला देताना त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. त्या म्हणाल्या होत्या, “इथे तुम्हाला कोणीही कुणासोबत झोपायला भाग पाडत नाही. तुम्ही किती तडजोड करायला तयार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे खूप सोपे आहे. जर तुम्ही ‘नाही’ म्हणाल तर आणखी 10 मुली ‘हो’ म्हणायला तयार आहेत. हे आवश्यक नाही की तुम्ही त्यांच्यासोबत झोपा आणि ते तुम्हाला भूमिका देतील. ते तुम्हाला गर्दीत कुठेतरी छोटी भूमिका देऊ शकतात. हा व्यवसाय आहे. ही तुमची निवड आहे.” नीना गुप्ता यांचे 2 वर्षे जुने हे वक्तव्य आता सोशल मीडियावर वादाचे कारण ठरले आहे.

https://youtu.be/Uppt2Vwrn_8?si=cZDm2WUqkVX46skm

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil

You May Also Like