Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Baramati Loksabha | महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघींनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या आधारे कोणाकडे किती मालमत्ता आहे, याची माहिती समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी संपत्तीबाबतचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे (Baramati Loksabha) सादर केले आहे. सुनेत्रा पवार यांची एकूण मालमत्ता 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे रोख रक्कम 3 लाख 36 हजार 450 रुपये आहे. त्यांच्या बँकेत एकूण 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 रुपये जमा आहेत. अजित पवार यांच्या बँकेतील ठेवी 2 कोटी 27 लाख 64 हजार 457 रुपये आहेत. सुनेत्रा पवार यांच्यावर 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपयांचे कर्ज आहे. अजित पवार यांच्यावर 4 कोटी 74 लाख 31 हजार 239 रुपयांचे कर्ज आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे किती संपत्ती आहे?
खासदार सुप्रिया सुळे या करोडोंच्या मालक आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीबाबत अनेक माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे ना गाडी आहे ना विमान.

सुप्रिया सुळे यांच्यावर किती कर्ज आहे?
सुप्रिया सुळे यांच्यावर 55 लाखांचे कर्ज आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून 55 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांच्या भावजय आणि पुतण्याकडून एकूण 55 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले आहे. सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले