आमदारांची चांदी : आमदारांच्या पगारात सरकारने थेट 40 हजार रुपयांची वाढ केली

West Bengal MLA Salary: पश्चिम बंगालच्या आमदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज विधानसभेत राज्यातील आमदारांच्या पगारात दरमहा 40,000 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली.

विधानसभेत याची घोषणा करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, पश्चिम बंगाल विधानसभेच्या आमदारांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्या मासिक पगारात 40,000 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी आमदारांना 10,000 रुपये, राज्यमंत्र्यांना 10,900 रुपये मिळत होते. पगारातील या नवीन सुधारणानंतर दरमहा 50,000, 50,900 आणि 51,000 मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde