शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

Amol Kolhe: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आज पासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी-जुन्नर येथून किल्ल्याच्या पायथ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. शेतकरी मोर्चा च्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन जनतेत जाऊन सरकारला जाब विचारत आहेत. पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात, अशी घोषणा देऊन अमोल कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बंधू- भगिनी मोर्चात सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रियाताई सुळे सहभागी होणार आहेत. या मोर्चाची सांगता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभेच्या द्वारे होणार आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आज हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहोत. पुणे जिल्ह्यात ३ दिवस हा मोर्चा होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर सांगता होणार आहे. शेतकऱ्या विषयाची संसदेत सरकार आम्हाला बोलू देत नसेल. तर रस्तावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा. हीच आमची मागणी आहे, असे अमोल कोल्हे म्हणालेत.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेत आहेत. आमचे महत्त्वाचे सहा मुद्दे असल्याचं शेतकरी आवर्जून सांगत आहेत. यात कांद्याची निर्यात बंदी तत्काळ उठवण्यात यावी, कांद्याच्या निर्यातीच धोरण निश्चित करण्यात यावं, बिबट्या प्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फेज लाईट लावण्यात यावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट ५ रु अनुदान देण्यात यावं, पीकविमा कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य शेतकऱ्यांना विम्याची रक्कम सहज उपलब्ध व्हावी, तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, अशा मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळताना अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारनं सुटसुटीत धोरण तयार करावं, अशा मागण्या या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडं करण्यात येणार असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, मागील आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानवरुन ट्विट करत २ लाख टन कांदा खरेदी करणार आणि २४१० रुपये प्रति क्विटंल देणार असं सांगितलं होत. पण आज ती खरेदी झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी फक्त तिथं जाऊन फोटो काढतात. सरकार ठामपणे का भूमिका घेत नाही? सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी केंद्र सरकारची वेळ मिळते. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी का वेळ मिळत नाही? असा सवाल यावेळी अमोल कोल्हे यांनी केला.

शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सत्ताधारी सांगतात. पण त्यांच्या कृती आणि करण्यामध्ये खूपच फरक आहे. जर हे शेतकऱ्यांचं सरकार असेल तर जेव्हा कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकार धोरण घेत असताना सरकार ठामपणे का सांगत नाही असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, ही यात्रा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात आहे कोणी हिला रोखू शकणार नाही, असेही अमोल कोल्हे म्हणाले. तसेच २५ लाख कोटींचे कर्ज मोठ्या उद्योजकांचे माफ होतात, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल, तर सरकारला लाज वाटायला हवी असा हल्लबोलही अमोल कोल्हेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत