‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित

Teen Adkun Sitaram : इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी (Movie) प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram) या चित्रपटाचे जबरदस्त टिझर (Teaser) सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच उत्तर आपल्याला २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. (Supreme Motion Pictures Pvt. Ltd.) आणि नितीन वैद्य प्रोडक्शन (Nitin Vaidya Production) प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.

टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबातील असून आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. ‘दुनिया गेली तेल लावत’ असा काहीसा ॲटिट्यूड असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात काहीतरी वादळ आल्याचे दिसत असून हे वादळ कसे निवळणार हे पाहाणे औस्तुक्याचे ठरणार आहे. टिझर पाहता कलाकारांची ही दमदार फळी आपल्या भन्नाट अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणणार आहेत. टिझरमध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे दिसत असले तरी चित्रपटात आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच. यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. ‘तीन अडकून सीताराम’चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.’’

Teaser link : https://youtu.be/DkJeTBg6JBU?si=eym778I1G1h2gpce

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole