Jayant Patil | मुले शाळा सोडून गेले तर शाळा बंद पडत नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

Jayant Patil | काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले. त्यांनी विचारधारा बदलली. पार्टी सोडली आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्या पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही, असा अप्रत्यक्ष टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लगावला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवाडी जिल्हा सातारा येथे आयोजित प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते.

ते म्हणाले, काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले. त्यांनी विचारधारा बदलली. पार्टी सोडली आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्या पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही, नव्याने विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करत असतो. आमच्या शाळेचे हेडमास्तर लय खमकी आहे. पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही. तुमच्या आमच्या काळजाचा विषय आहे. हे मी महाराष्ट्रातील गावोगाव गेल्यावर मला दिसत आहे. मी मोदी साहेबांचे आभार मानतो. मोदी साहेबांनी भोपाळमध्ये घोषणा करताच आमचा पक्ष संपूर्ण स्वच्छ झाला. आज देशांमध्ये सर्वात स्वच्छ पक्ष कोणता असेल तर तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे हे मी तुम्हाला ठाम पणे यांना सांगत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा