T20 World Cup 2024 | हे 3 खेळाडू पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात भारताकडून खेळणार, फलंदाजीत करणार कहर!

आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ अमेरिकेला रवाना झाला आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे, परंतु असे तीन खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात भारतासाठी मैदानात उतरतील. एवढेच नाही तर या तिन्ही खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत हे खेळाडू टीम इंडिया साठी ट्रम्प कार्ड ठरू शकतात.

संजू सॅमसनचा हा पहिलाच विश्वचषक आहे
आयसीसी टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघात संजू सॅमसनची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली आहे. मात्र, ऋषभ पंत त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे आव्हान आहे, पण त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाल्यास तो फलंदाजीत मोठे योगदान देऊ शकतो. संजू पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडियासाठी मैदानात उतरणार आहे.

यशस्वी जयस्वालचाही पहिलाच विश्वचषक
डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाललाही टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. यशस्वी जयस्वाल गेल्या काही काळापासून फलंदाजीत सातत्याने स्फोटक कामगिरी करत आहे. यशस्वीने आयपीएल 2024 मध्येही दमदार कामगिरी केली होती. यशस्वीला 155.91 च्या स्ट्राईक रेटने केवळ 435 धावा करता आल्या. मात्र, यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले आहे. अशा परिस्थितीत यशस्वी फॉर्ममध्ये असेल तर तो टी-20 विश्वचषक स्पर्धेत बॅटने तुपान आणू शकतो.

शिवम दुबेने आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली
डावखुरा फलंदाज शिवम दुबेने आपल्या दमदार खेळाने खळबळ उडवून दिली आहे. शिवमने या मोसमात 14 सामन्यात 396 धावा केल्या आहेत. मात्र, बाद फेरी गाठताना त्याने आपली लय नक्कीच गमावली. असे असतानाही शिवम दुबेला संधी मिळाली तर तो टी-20 विश्वचषकात कहर करू शकतो.

ईशारा देण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी