Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Mahesh Tapase – मनसे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत केलेल्या वक्तव्याचे राष्ट्रवादी शरद पवार चे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.तपासे म्हणाले ‘राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असूनही राज ठाकरेंचा मनसे पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राजकीयदृष्ट्या नगण्य आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एका नव्या राजकीय चिन्हाखाली एकत्र आणण्याची क्षमता पवार साहेबांमध्ये आहे हे आज महाराष्ट्राने पहिले.राज ठाकरे व त्यांच्या पक्षाने यातून प्रेरणा घ्यायला हवी असा खोचक टोला महेश तपासे यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पवार साहेबांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा समोर कडवे आव्हान उभे करणार. आमचे नवीन पक्ष चिन्ह तुतारी आज रायगडावर वाजली आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आज महाराष्ट्र ने पाहिले असेही तपासे पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Pune Loksabha Election | खासदार म्हणून पुणेकरांची पसंती कोणाला? माध्यमांच्या सर्व्हेत ‘हे’ नाव आघाडीवर

‘कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे’, अजय बारसकर यांचे जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार असल्याची चर्चा