उत्तर प्रदेशातील ‘या’ व्यक्तीची लागली लॉटरी, २५ वर्षे दर महिन्याला मिळणार ५.५ लाख रूपये

ऊपरवाला जब भी देता है, तो छप्पर फाड के देता है… असाच काहीसा प्रकार दुबईत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आर्किटेक्ट मोहम्मद आदिल खानसोबत घडला आहे. आदिल खानचे नशीब एका रात्रीत असे चमकले की त्याच्यावरही विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील मेगा पुरस्काराचा पहिला विजेता म्हणून आदिलची घोषणा करण्यात आली आहे. खान दुबईतील एका रिअल इस्टेट कंपनीसाठी इंटीरियर डिझाइन सल्लागार म्हणून काम करतो. त्याला पुढील 25 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 5.5 लाख रुपयांहून अधिक पैसे मिळणार आहेत.

फास्ट 5 ड्रॉचा पहिला विजेता
गल्फ न्यूजनुसार, खानला फास्ट 5 ड्रॉचे पहिले मेगा बक्षीस विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही वेळापूर्वी त्यांनी लॉटरीचे तिकीट घेतले होते. एमिरेट्स ड्रॉच्या बॅनरखाली टायचेरोसद्वारे चालवलेली लॉटरी सुमारे 8 आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत पहिला ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये आदिल खानला पहिला करोडपती घोषित करण्यात आला.

आदिल आपल्या भावाच्या कुटुंबाचीही काळजी घेतो
ही बातमी समजताच खानला धक्का बसला. लॉटरी जिंकल्यानंतर तो म्हणाला, माझ्या कुटुंबासाठी कमावणारा मी एकमेव व्यक्ती आहे. माझ्या भावाचे कोविड महामारी दरम्यान निधन झाले. मी त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेत आहे. कुटुंबात वृद्ध आई-वडील आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्यामुळेच मला नेहमी असे वाटायचे की अतिरिक्त उत्पन्न मिळणे चांगले. आदिल पुढे म्हणाला, जेव्हा मी माझ्या घरच्यांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनीही यावर विश्वास ठेवला नाही. गैरसमज होऊ नये म्हणून मी पुन्हा माझे नाव तपासायला सांगितले.

लक्षाधीश होण्याचा सर्वात वेगवान मार्ग
पॉल चाडर, मार्केटिंग प्रमुख, टायचेरोस यांनी त्यांचा पहिला विजेता घोषित करताना आनंद व्यक्त केला. लाँच झाल्यानंतर आठ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, FAST 5 साठी आमचा पहिला विजेता घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही त्याला फास्ट 5 म्हणतो कारण हा करोडपती बनण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे. खानला दरमहा 25000 दिरहम (रु. 559822) मिळतील.