‘श्री कृष्ण’ शो मधला सुदामा आठवतो? जाणून घ्या सध्या अभिनेता मुकुल नाग काय करतो?

Where is 1993 ‘Shri Krishna’ Show Sudama: 1993 मध्ये ‘श्री कृष्णा’ टीव्ही शो खूप लोकप्रिय झाला होता. 80 आणि 90 च्या दशकातील ‘महाभारत’, ‘रामायण’ आणि नंतर ‘श्री कृष्ण’ हे शो अजूनही लोकांना आठवतात. रामानंद सागर यांच्या (Ramanand Sagar) ‘श्री कृष्णा’ या आणखी एका हिट शोमध्ये कृष्ण आणि सुदामा यांच्यात दाखवलेली मैत्री प्रत्येकाच्या लक्षात असेल. पण त्यावेळी सुदामाची भूमिका साकारणारा मुकुल नाग (Mukul Nag) सध्या काय करतोय हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर जाणून घेऊया…

तसे, ‘श्री कृष्ण’ टीव्ही शो 1993 मध्ये प्रसारित झाला होता. पण कोविड-19 दरम्यान हा शो पुन्हा प्रसारित करण्यात आला. या शोमध्ये सर्वदमन डी बॅनर्जी, स्वप्नील जोशी, रेश्मा मोदी, पिंकी पारीख, दामिनी शेट्टी, श्वेता रस्तोगी, विजय कविश यांसारख्या इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. पण या शोमध्ये सुदामाची भूमिका साकारणाऱ्या मुकुल नागला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

शोचे निर्माते रामानंद सागर यांनी मुकुल नागला सुदामाची भूमिका ऑफर केली होती, परंतु तो ही भूमिका योग्यरित्या साकारू शकेल की नाही अशी भीती त्याला वाटत होती. परंतु मुकुल नागने ही भूमिका चोख बजावली. सुदामाच्या भूमिकेत चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुकुलने 2005 मध्ये ‘साई बाबा’ टीव्ही मालिकेतही काम केले. त्याच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही दिले. ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अली बाबा’ या टीव्ही शोमध्ये मुकुल नाग शेवटच्या वेळी दिसला होता. या शोमध्ये त्याने दारा गाझीची भूमिका साकारली होती.

61 वर्षीय मुकुल नागने एकापेक्षा एक अविस्मरणीय शोमध्ये काम केले आहे. ‘अली बाबा’ शोमध्ये काम केल्यानंतर तो आता सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो. त्याचे सोशल मीडियावर 1379 फॉलोअर्स आहेत, जिथे तो त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी पोस्ट करतो. मुकुल नागचा विवाह इंदिरा मिश्रा यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुली आहेत. एकीचे नाव प्रियमवदा आणि दुसऱ्या मुलीचे नाव पाखी.