Sunetra Pawar| सुनेत्रा वहिनींनी भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन जाणून घेतले भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (SUnetra Pawar) या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

तसेच उंडवडी सुपे येथे प्रचार सभा आटोपल्यावर बारामतीकडे निघाल्या असता त्यांनी चक्क भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणीवर आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वास त्यांना दिला. तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये जाऊन भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत सुद्धा घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले. यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही जेष्ठ नागरिक आले होते. त्यांच्याशीही सुनेत्रा वहिनी यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी