Prakash Ambedkar | भाजपला घरी बसवण्याची हीच योग्य संधी, ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

Prakash Ambedkar | देशभरातील मतदानाची घसरती टक्केवारी चिंतेचा विषय असून, भाजपने लोकांचा अपेक्षाभंग केल्याने मतदानाचे प्रमाण घसरत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. यावेळी भाजपला घरी बसवण्याची संधी आली असून, मुस्लिम समाजाने ही संधी घालवू नये असे आवाहन त्यांनी केले. शिरूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारासाठी आज हडपसर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, राज्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर कोणत्याही पक्षाने मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही त्यावरून या पक्षाचा खरा चेहरा समाजाने ओळखावा. वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले आहे असेही त्यानी स्पष्ट केले.

आज भाजपला हरवण्याची ताकत मुस्लिम समाजात असून, त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार