जे गडकरींनी करून दाखवले ते शरद पवारांना कृषिमंत्री असताना का शक्य झाले नाही ?

सोलापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पुन्हा एकदा जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले मात्र हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही. हा ही प्रश्नच आहे. असं त्यांनी म्हटले आहे.

गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच मात्र शरद पवार हे कृषीमंत्री होते, साखर कारखानदारांचे मंत्री होते. याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याची, टीका राजू शेट्टी यांनी केली.ते पुढे म्हणाले की, सगळ्यात महत्वाची गोष्ट, शरद पवार हे साळसूदपणे शेतकऱ्यांना सांगतात की, साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्यावर जे कर्ज काढले जाते त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावे, असे साळसूदपणे सल्ला देतात.असं ते म्हणाले.