एकच स्टार भारतीय ४०० धावांचा माझा वर्ल्ड रेकॉर्ड तोडेल; ब्रायन लारानं सांगितलं नाव

Brian Lara 400 runs : वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराने (Brian Lara) १२ एप्रिल २००४ ला विश्वविक्रम नोंदवला होता. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूला ४०० धावांचा आकडा गाठता आला होता. तेव्हापासून काही खेळाडूंनी त्रिशतक झळकावले पण कोणालाच ४०० धावांचा विक्रम मोडता आला नाही. पण, आता खुद्द लाराने हा विक्रम भारताचा स्टार खेळाडू तोडू शकतो असा विश्वास व्यक्त केला.

भारताचा सलामीवीर शुबमन गिलमध्ये (Shubman Gill) एका डावात ४०० धावा करण्याची क्षमता असल्याचे त्याने सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ब्रायन लाराने म्हटले, “शुबमन गिल माझा विश्वविक्रम तोडू शकतो. त्याला वनडे विश्वचषकात भलेही शतक झळकावता आले नसले तरी त्याच्यात खूप क्षमता आहे. त्याचे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक आहे. वनडे मध्ये द्विशतक ठोकण्याची किमया देखील त्याने साधली. गिलने आयपीएलमध्ये अनेकदा मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. आगामी काळात अनेक वर्षे तो क्रिकेटवर राज्य करेल.”

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास