“आम्ही साहेबांना अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला होता, पण…”, शिवतारेंचे लक्षवेधी वक्तव्य

Vijay Shivtare: देशात सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. याठिकाणी महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. अशातच शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

विजय शिवतारे म्हणाले की, 2004 साली राज्यात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार निवडून आले होते. त्यावेळी मी देखील राष्ट्रवादीत होतो. त्या दिवशी आम्ही रात्री अकराच्या फ्लाईटची तिकिट काढली होती. डॉ. महाजन, शिवाजीराव नलावडे, गटनेते रवींद्र पवार, मुबारक खान यांच्यासही मी असे पाच जण शरद पवारांची वेळ घेऊन आम्ही दिल्लीत गेलो होतो.

त्यावेळी साहेबांना आम्ही सांगितले की चांगला कर्तृत्व माणूस अजित पवार आहेत. त्यांना आपण मुख्यमंत्री करायला हवेत. मुख्यमंत्री पद आपल्याला घ्यायला हवे. त्यावेळी कॉंग्रेस मोठा भाऊ आहे. आपण जास्तीची खाती घेऊ असं म्हणून शरद पवारांनी हा मुद्दा झटकून दिला होता. त्यावेळी जर अजितदादांना मुख्यमंत्री केलं असतं. तर आजचं चित्र वेगळं असतं आणि ही परिस्थिती आली नसती. असेही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय