Devendra Fadnavis | मोदीजीच्या विकासाच्या इंजिनासोबत बारामतीची बोगी जोडा, फडणवीसांचे मतदारांना आवाहन

Devendra Fadnavis | देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तळ ठोकून आहेत, याशिवाय महायुतीच्या अन्य बड्या नेत्यांनीही बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजातील सर्व घटकांचा विकास केला. २५ कोटी कुटुंबांना दारिद्रघातून बाहेर काढले. त्यामुळे जागतिक स्तरावर मोदी महिलची चर्चा सुरू आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असून मोदीजीच्या विकासाच्या इंजिनासोबत बारामतीची बोगी जोडा – बारामतीच्या सूनबाईंना खासदार म्हणून पाठवा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ वारजे येथे आयोजित सभेमध्ये फडणवीस बोलत होते. यावेळी उमेदवार सुनेत्रा पवार, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, माणिकराव कोकाटे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, दीपक मानकर, रमेश कोंडे, दिलीप बराटे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक  ‘पवार विरुद्ध पवार’ किंवा ‘पवार विरुद्ध सुळे’ अशी ही  नाही. एकीकडे तुमच्यापुढे राहुल गांधी यांची २६ पक्षांची खिचडी असलेली इंडिया आघाडी आहे; तर दुसरीकडे मोदीजींचे मजबूत इंजिन असलेली महायुती आहे. या इंजिनला दलित, ओबीसी, आदिवासी यासह सर्व समाज घटकांच्या बोगी जोडलेल्या आहेत. पण गांधी यांच्या इंजिनला बोगीच नाही, प्रत्येक नेत्याचे वेगळे इंजिन असून हे इंजिन वेगवेगळ्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करत असल्याने एकाच जागेवर ठप्प आहे. इंडिया आघाडीमध्ये कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही, त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी मोदोजींचे इंजिन आवश्यक आहे. सुनेत्रा पवार यांच्या घड्याळाला मतदान केल्यानंतर ते थेट मोदींना मिळणार आहे. पुण्यातील मेट्रोचा विस्तार होत आहे. मुळामुठा नदी सुधारणेसाठी १८०० कोटी दिले, त्यातून स्वच्छ नदी बघायला मिळेल, रिंगरोड झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शहर होईल, नितीन गडकरी शहराला जोडणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल बांधत आहेत.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय