Eknath Shinde | “बाळासाहेबांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली, मात्र मी खुर्चीसाठी…”, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवली, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर केला. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

कंटेनर कुठून कुठे पोहोचले ते हळुहळू बाहेर येईल
मला कुठली हाव नाही, पैशांचा मोह नाही. ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, उठता बसता खोके पुरत नाहीत त्यांना कंटेनर लागतात, असे लोक बोलतात. कंटेनर कुठून कुठे पोहोचले हे हळूहळू बाहेर येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी येथे दिला. बाळासाहेब म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली. हातचे सगळे घालवले, सोन्यासारखी माणसे गेली, पक्ष गेला. मात्र आपण सत्ता, खुर्चीसाठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा