पुणे विद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीनुसार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे काम अतिंम टप्प्यात असून आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुणे विद्यापीठात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन पाहणी केली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, विद्यापीठातील आर्किटेक्ट साळसकर, मूर्तिकार परदेशी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, वैष्णवी सातव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, उपाध्यक्ष हर्षल खैरणार, प्रदीप हुमे, शिवराम जांभुळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. त्यादृष्टीने विद्यापीठात अतिशय जलद गतीने काम सुरु असून हे काम अतिंम टप्यात आहे. आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी याठिकाणी पाहणी करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या समवेत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करत आढावा घेतला.

दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांनी कात्रज येथे परदेशी आर्ट स्टुडीओ येथे भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी करत मूर्तिकार परदेशी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.